Ad will apear here
Next
इस्राएल आणि देवाचे राज्य
जगात सध्या सुरू असलेल्या घडामोडींवरून जग कसे अंताच्या जवळ जात आहे आणि त्यासाठी कारणीभूत असणाऱ्या गोष्टी आपण कशा निरंतर करत आहोत, या सगळ्या गोष्टी आधीच बायबलमध्ये सांकेतिक भाषेत कशा लिहून ठेवल्या आहेत, ते जगासमोर आणण्याचे काम ‘इस्राएल आणि देवाचे राज्य’ या पुस्तकाच्या माध्यमातून रेजी बंकापूर यांनी केले आहे... या पुस्तकाचा थोडक्यात परिचय...
.................
दुसऱ्या महायुद्धानंतरच्या काळात जगभरात मानवी इच्छा-अपेक्षांचा कसा चुराडा झाला. परमेश्वरी योजनेप्रमाणे २५०० वर्षांनंतर पुनर्स्थापित इस्राएलने आता तरी जगाच्या मुक्तीच्या योजनेचा स्वीकार करावा यासाठी पत्राद्वारे केलेले आवाहन... हे सगळं असणारी ‘इस्राएल आणि देवाचे राज्य’ ही जगाच्या अंताबद्दलची मार्गदर्शनपर पुस्तिका आहे. 

रेजी बंकापूर यांनी मराठीत लिहिलेल्या ‘इस्राएल आणि देवाचे राज्य’ या पुस्तकात जागतिक घडामोडी, त्यात इस्राएलचा सहभाग, प्रदूषण, ग्लोबल वॉर्मिंग, अतिरेकी, अत्याचार, आत्महत्या इत्यादी बायबलवर्णित जगाच्या अंताची चिन्हे स्पष्ट दिसत असताना अचानक नजीकच्या भविष्यात होणारा जागतिक अर्थव्यवस्था नष्ट करणारा महाआघात, त्यानंतर शेवटची महासंकटे व अंत यांचा विचार केला आहे. हा कल्पनीय महाआघात कोणता व कसा होणार, हे बायबलचे गुप्त सांकेतिक भाषांमध्ये लिहिलेले भविष्य उकलून जगाला प्रथमच तर्कशुद्ध रास्त सयुक्तिक संदर्भशृंखलेसहित केलेले प्रकटीकरण व येणाऱ्या नव्या युगाचे सत्य सांगणारे हे पुस्तक आहे. 

हे संक्षिप्त, पण अगदी निराळे असे पुस्तक स्वातंत्र्यपूर्व काळापासूनची कथा सांगते. भारतातील, तसेच जगभरातील मानवी इच्छा अपेक्षांचा स्वातंत्र्यप्राप्तीनंतर किंवा दुसऱ्या महायुद्धानंतर कसा चुराडा झाला, याचा उहापोह यातून केलेला दिसतो. या पुस्तकाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे बायबलमध्ये सांकेतिक भाषेत लिहिलेले गुप्त भविष्य ते उलगडून जगाला सांगणार आहे. पुस्तकाचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे परमेश्वराचा जगावर होणारा कोप याची सत्यता ते प्रमाणित करते. परमेश्वराच्या अद्वितीय, अकल्पित महाभयंकर फटक्याने अगदी अनपेक्षितपणे कसा हा कोप होणार आहे, जो जगाने आजवर इतिहासात कधीही अनुभवला नाही. प्रत्येक पापी मनुष्यास कशी शिक्षा मिळणार आहे, याचे संपूर्ण वर्णन या पुस्तकात वाचायला मिळणार आहे. 

सर्व पापी जगतास शिक्षा दिल्यानंतर बदललेले पवित्र जग कसे असेल, याचेही वर्णन पुस्तकात शेवटी करण्यात आले आहे. यातून सध्याच्या दुर्दैवी, निराशाग्रस्त जगतास हे पुस्तक आशेचा किरण कसा दाखवते हे समजणार आहे. नव्या युगाची पहाट, शांती, प्रेम, आरोग्य, आनंद, विपुलता, समाधान आणि स्वर्गीय आशीर्वादांनी भरलेली असेल असे आश्वासन देते. हे पुस्तक वाचल्यानंतर बायबल या धर्मग्रंथातील भविष्यवाण्या व वर्णिलेला कोप कसा रास्त व तर्कशुद्ध आहे, याची खात्री पटते. परंतु, जसे की या देशातील लोकांची मने व त्यांच्या सवयी या कधीही बदलणाऱ्या नाहीत, त्यामुळे देवाच्या कोपाचे होणारे भविष्य अटळ आहे, असे लेखकाला वाटते.

पुस्तक : इस्राएल आणि देवाचे राज्य
लेखक : रेजी बंकापूर
प्रकाशन : एबी पब्लिकेशन्स
पृष्ठे : ८३ 
मूल्य : २०० रुपये

(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागविण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/PZQABY
Similar Posts
लढवय्या.. कॉम्रेड पुंजाबाबा गोवर्धने स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्रोत्तर भारतातील पहिले शेतकरी नेते, भातभाव लढ्याचे प्रणेते, इगतपुरीचे लोकनायक आमदार, शेतकरी आणि लोकांच्या हक्कासाठी लढणारा सच्चा आणि लढवय्या नेता, ही कॉम्रेड पुंजाबाबा गोवर्धने यांची खरी ओळख आपल्या ‘लढवय्या.. कॉम्रेड पुंजाबाबा गोवर्धने’ या पुस्तकातून लेखिका सुमनताई गोवर्धने यांनी करून दिली आहे
समर्थ रामदास समर्थ रामदास स्वामी यांच्यात चातुर्य, कार्यक्षमता, संघटना, लोकसंग्रह, धैर्य, व्यवहारधर्मता आदी अनेक गुण होते, असे गुरुदेव शंकर वासुदेव अभ्यंकर यांनी सांगितले आहे. या गुणांवर प्रकाश टाकीत समर्थ रामदासांचे चरित्र अभ्यंकर यांनी ‘समर्थ रामदास’मधून कथन केले आहे. पुस्तकाचा अल्प परिचय...
श्री गजानन - विजय भक्तिरसास्वाद शेगावच्या श्रीगजानन महाराजांचा महिमा त्यांचे भक्त वेळोवेळी कथन करीत असतात. ते प्रकट झाल्यानंतर साक्षात्कारी पुरुष म्हणून ओळखले जाऊ लागले. अनेकांना त्यांनी दिशा दाखविली प्रत्येक वेळी मदत केली. त्यांचे आयुष्य विविध लीलांनी भरलेले आहे.
श्री अक्कलकोट स्वामी समर्थ आज श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आहे. त्या निमित्ताने, ‘श्री अक्कलकोट स्वामी समर्थ’ या पुस्तकाचा अल्प परिचय...

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language